साक्री : साक्री-धुळे महामार्गावर काल मध्यरात्री भरधाव वेगातील दोन ट्रक इच्छापूर गावाजवळ एकमेकांना धडकल्यात. झालेल्या अपघातामुळे या दोन्ही ट्रकांनी पेट घेतल्याने त्यात दोन्ही ट्रक जळून खाक झाल्या. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यात मात्र सुदैवाने काहीही जीवितहानी झालेली नाही.