जळगाव : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था मुलींची व मुलांच्या संस्थेत कौशल्य वृद्धीसाठी दोन दिवशीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रप्रदर्शनाचे मुलींच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सोमेश्वर वाघमारे यांच्याहस्ते शुक्रवार 16 डिसेंबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी जळगाव शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस. महाजन, चाळीसगाव औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस. राजपुत, उपप्राचार्य कोठवदे, मुलींच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कौशल्यास प्रोत्साहन
या प्रदर्शनात विद्यार्थी व विद्यार्थींनी विविध स्वतः तयार केलेले मॉडेल मांडलेले आहेत. या तंत्रप्रदर्शनातून मुलींमध्ये कौशल्य गुणासवाव मिळावा व त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रप्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या तंत्रप्रदर्शनात मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थींनीनी तयार केलेले विविध प्रकारचे मॉडल, गारमेंट, बेकरी साहित्य, सौंदर्य प्रसाधने आदी उपलब्ध आहेत. या प्रदर्शनाचा समारोप शनिवार 17 डिसेंबर रोजी अप्पर पोलिस अधिकारी मोक्षदा पाटील, नाशिक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सहसंचालक एस.आर. सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे.
तंत्रप्रदर्शनातून नवनिर्मितीस मिळणार वाव
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय नाशिक विभागातील सर्व शासकीय, अशासकीय अद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तंत्र प्रदर्शन 2016 चे आयोजन करण्यात आले आहे. सहसंचालक सतिष सुर्यवंशी यांच्या प्रेरणेतून तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य व्ही.एम. राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य शोध व नवनिर्मिती हे गुण वाढीस लागून त्यांचे बुद्धीस चालना मिळण्यास मदत मिळून त्यांचे कौशल्य वृद्धींगीत व्हावे व निकोप स्पर्धा वाढीस लागावी म्हणून संस्थेतील विविध व्यवसायातील निदेशक व प्रशिक्षणार्थी यांनी प्रयोग करून प्रोजेक्ट वस्तू अतिषय छान संशोधनपर केलेले आहे.
विविध शाळेतील विद्यार्थ्यांची प्रदर्शनास भेट
मुलांच्या औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.जी. वाघमारे यांच्या हस्ते झाले आहे. याप्रसंगी पी.डी. कुलकर्णी, डी.ए. महाजन, डी.व्ही. पाटील, राठोड आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना यांचा निश्चित लाभ होणार आहे. या तंत्र प्रदर्शनाला शहरातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थीं भेट देत आहेत. विद्यार्थींनी आपले प्रोजेक्ट तंत्र प्रदर्शनात सादर केले आहेत. या तंत्रप्रदर्शनात इलेक्ट्रीकल, माहिती तंत्रज्ञान, अपारंपारिक उर्जा स्त्रोत आदी बाबतचे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत.तसेच स्वखर्चातून गारमेंट तयार करून त्यांना स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळत आहे. या प्रदर्शनातून पहिल्या पाच येणार्या मॉडेल जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनांसाठी निवड करण्यात येणार आहे. तंत्रप्रदर्शन यशस्वीतेसाठी कोठवदे साहेब, व्ही.जी. भोळे, महेश सुर्यवंशी, योगेश मनोरे, एल.आर. पाईलख सतिष वाघ हे कामकाज पाहत आहेत.
मुलांच्या तंत्र निकेतन प्रदर्शनात फिटर, विजतंत्री, वायरमन, पीपीओ, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रीक उपकरण, आरएसी यांत्रीक, डिझेल मोटर मॅकनिक, पंप मॅकनिक, मशिनिष्ठ, ग्राईंडर, टर्नर, एमएमटीएम, सुतारकाम आदी विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
– आर.एम. डांगे
प्राचार्य, आद्योगिक प्रशिक्षण संस्था