दोन दिवसांनंतर एसटी कर्मचार्‍यांचा संप मागे

0

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा
मुंबई – दोन दिवसांनंतर एसटी कर्मचार्‍यांचा संप मागे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढला असून एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याचे जाहिर केले आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. हे कामबंद आंदोलन संपाच्या दुसर्‍या दिवशी सुरूच होती. राज्यातील अनेक ठिकाणच्या बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचं हे आंदोलन आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान राज्यभर सुरू असलेल्या काम बंद आंदोलनात कर्मचार्‍यांचे काही ठिकाणी निलंबन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातून 121 जणांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले तर यवतमाळ जिल्ह्यातील 46 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे. तर मात्र नाशिक आगारातील काही जणांचं निलंबन मागेही घेण्यात आल्याचे देखील प्रकार झाला आहे. दरम्यान मात्र एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यावर देखील संप सुरूच राहणार असल्याचा इशारा एस.टी.कर्मचार्‍यांनी दिला होता. दरम्यान, शिवशाही बस आणि शिवसेना प्रणित वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरु होती.