दोन दुचाकींची समोरा-समोर धडक; चार जण जखमी

0

जळगाव – एमआयडीसी भागातील आर.एल. चौफुलीवर दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जळगावकडून नेरीकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.१९, ७५६८ (एचएफ डिलक्स) ला समोरुन येणाऱ्या ॲक्टिवाने जोरदार धडक दिली़ या अपघातात डिलक्स वरील चालक शेख इम्रान शेख करीम वय २५ रा़ नेरी ता़ जामनेर व शेख अमिन शेख जब्बार मुळे रा़ औरंगाबाद ह.मु. नेरी ता. जळगाव आणि ॲक्टिवाचे चालक संजय कुमार वय-४० रा. अलवर, राजस्थान व सुमेरसिंग राजपुत दोघे ह.मु.मेरीको कंपनी जवळील राजेश ढाबा हे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गवर जबर अपघात झाल्याचे पाहुन रिंक्षा चालक राजु चौधरी, गणेश लक्ष्मण शिंदे आणि चारचाकी चालक शेख इरफान शेख गफ्फार यांनी आपल्या वाहनात जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.