A bike rider died in an accident in Borkheda village धरणगाव : दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातानंतर धरणगाव तालुक्यातील बोरखेडा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू ओढवला. हा अपघात चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला होता. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपघातात विजय सुरेश चौधरी (35, बोरखेडा) यांचा मृत्यू ओढवला होता.
अपघातात दुचाकीस्वार ठार
19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास विजय चौधरी हे त्यांची बजाज प्लॅटीना मोटर सायकल (एम.एच.19 सी.क्यू.1040) हिच्याने मुसळी फाटा येथील कंपनीतून कामावरुन घरी परतत असताना चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास समोरुन भरधाव वेगात येणारी हिरो पॅशन (एम.एच.19 सी.के. 7861) वरील चालक (नाव गाव माहीत नाही) ने विजय यांच्या दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या अपघातात विजय यांचा मृत्यू ओढवला तर अपघाताची खबर न देता वाहन चालक पसार झाल्याने याबाबत मयत विजय चौधरी यांच्या पत्नी राजश्री चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटर सायकल (एम.एच.19 सी.के. 7861) वरील चालक अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहेत.