‘दोन पाऊल पुढे पुस्तकाचे’ महामंडलेश्वर जनार्दन महाराजांच्या हस्ते प्रकाशन

0

रावेर- लेखिका कविता पवार लिखीत ‘दोन पाऊल पुढे’ पुस्तकाचे प्रकाशन गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर महामंडलेश्वर जनार्दन महाराज, उद्योजक जितेंद्र पवार यांच्याहस्ते फैजपूर येथे करण्यात आले. गत वर्षभरापूसन पवार या पुस्तकाचे लिखान करीत होत्या. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणीमुळे सध्या नकारात्मक विचार वाढत आहे त्यामुळे या पुस्तकातुन त्यांना प्रेरणा मिळणार आहे. शिक्षण व जीवन जगण्याची कला तसेच ग्रामीण विद्यार्थांच्या चरित्र्यावर पुस्तकाचे लिखाण आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार व परीस्थितीशी कसा संघर्ष करावा हे यातून शिकायला मिळणार आहे. ‘दोन पाऊल पुढे’ पुस्तकाचे लिखाण करीत असताना पवार यांनी रावेर, यावल, शेंदुणी, पालसह आदिवासी भागातील शाळांना भेटी देऊन सुमारे 64 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधन समस्या जाणून घेतल्या आहेत. पुस्तक लिखाणासाठी कविता पवार यांना त्यांचे पती उद्योजक जितेंद्र पवार, शिक्षक व कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे पवार यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.