पुणे । दोन बांगलादेशी चोरट्यांना गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी अटक केली. त्यांनी शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 गुन्ह्यातील 10 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आला. इदानूर रहेमान राकिब (वय 62) आणि जाकिर कोबिद हुसेन (वय 42, दोघेही सध्या रा. संतोषनगर) अशी त्यांची नावे आहेत.
दोघेही सराईत चोरटे असून 2015 मध्ये त्यांना चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 7 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर कोंढवा येथे घरफोडी करत असताना त्यांना पकडण्यात आले होते. त्या गुन्ह्यात सध्या ते जामिनावर असून ते अजूनही घरफोड्या करत आहेत. इदानूर हा व्हिसा न घेता भारतात आला तर हुसेन हा जून 2017 मध्ये एक महिन्याच्या प्रवासी व्हिसावर भारतात आला होता. तो परत न जाता येथेच राहून घरफोड्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.