दोन महिलांचा विनयभंग; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

नंदुरबार । काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा विषय छेडून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील वैशालीनगर मध्ये घडली. यातदोन महिलांचा विनयभंग झाल्याची तक्रार परस्पर विरोधी फिर्यादीत देण्यात आली आहे.

फिर्यादीवरुन दोन्ही गटातील 13 जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नगरमध्ये राहणार्‍या महिलेने मी व माझे पती सकाळी फिरायला गेलो होतो, यावेळी विकास मोरे, मंगला मोरे, मोनिका मोरे, मंगला शिवाजी कदम यांच्या सह 5 ते 6 जणांनी थांबून भांडण केली. मी सोडायला गेली असता माझा हात धरून लज्जास्पद वागणुक करण्यात आल्याचे फिर्यादीत सांगितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्‍या फिर्यादीत महिलेने जुन्या भांडणाची कुरापत काढून नरेंद्र चिंतामण जाधव, शैलजा नरेंद्र जाधव, तुषार नरेंद्र जाधव, रश्मी नरेंद्र जाधव यांनी हात छेड काढले व मुलगी मोनिका हिला मारहान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.