113 विषयांना मंजुरी ; जनआधारचा सभेवर बहिष्कार
भुसावळ– पालिकेची सर्वसाधारण सभा अवघ्या दोन मिनिटात आटोपली. प्रभागात कामे होत नसल्याने तसेच सभेत बहुमताच्या जोरावर बोलू दिले जात नसल्याने विरोधी पक्ष असलेल्या जनआधारने सभेवर बहिष्कार टाकला. सभेत 113 विषयांना मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेत जुन्या गटारीत तोडून आरसीसी गटारी बांधणे तसेच रिटेनिंग व्हॉलच्या कामांना अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. शहर विकासाच्या विविध विषयांना प्राधान्य देण्यात येईल, अशी शक्यता असलीतरी ती मात्र फोल ठरल्याची भावना विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकल्यानंतर व्यक्त केली.