दोन मोटारसायकल चोरट्यांना घेतले ताब्यात

0

जळगाव ।मोटारसायकल चोरी प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी नांद्रा येथील दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे. प्रेमनगरातील जयेश अरविंदकुमार मेहता यांची मोटारसायकल (क्र. एमएच-16-वाय-5688) गोलाणी मार्केट परिसरातील मायटी ब्रदर्स या दुकानाजवळून चोरी झाली होती.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे गणेश शिरसाळे यांना मिळालेल्या माहितीवरून इम्रान सय्यद आणि संजय भालेराव यांनी शनिवारी विनोद बारकू सोनवणे (वय 21), विनोद हरचंद सोनवणे (वय 22, दोन्ही रा. नांद्रा) यांना अटक केली. त्यांनीच मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.