* आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाला यश
* दोघे रूग्णांना मिळाला आर्थिक हातभार
अमळनेर । दुर्धर आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे युसूफ जोयफभाई बोहरी रा.अमळनेर यांना 2 लाखाची तर रानुबाई चव्हाण रा. खेडी सिम ता.अमळनेर यांना एका लाखांची मदत मिळाली आहे. आमदार शिरीष चौधरी हे नेहमीच गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देत असतात. आतापर्यंत त्यांच्या पाठपुराव्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळून योग्य उपचार व जीवदान मिळाले आहे.
युसूफ जोयफभाई बोहरी व रानुबाई चव्हाण या दुर्धर आजाराने त्रस्त असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी शिफारस केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे युसूफ जोयफभाई बोहरी रा अमळनेर यांना 2 लाखाची मदत व रानुबाई चव्हाण रा. खेडी सिम यांना 1 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. सदर मंजुरीचे पत्र देतांना आमदार चौधरी, तसेच कृउबा संचालक उदय नंदकिशोर पाटील, सुनील भामरे, डॉ.रावसाहेब पाटील, सुरेंद्र पाटील, जयवंत पाटील, किरण चव्हाण, अहमद अहसान बुर्हानी, अब्दुल कादर हुसैन सहैफी यावेळी उपस्थित होते. योग्यवेळी मदत मिळाल्याने बोहरी व चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी आमदार चौधरी यांचे आभार मानले.