दोन लाखांची चोरी

0

पुणे : कसबा पेठेतील क्विक सर्व्हिसेस कुरियरच्या कार्यालावर भरदिवसा तीन चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखत दोन लाखांची जबरी चोरी केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दुचाकीवरून तीनजण आले व त्यांनी कर्मचार्‍यांना बंदूक दाखवून कार्यालयातील दोन लाख रुपये व तीन मोबाईल चोरून नेले. मध्यवस्तीत भरदिवसा झालेल्या घटनेमुळे नागरिक व व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.