दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा

चोपडा : चोपडा तालुक्यातील वर्डा येथील माहेर असलेल्या विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह तीन जणांवर अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह तिघांविरोधात गुन्हा
चोपडा तालुक्यातील वर्डा येथील माहेर असलेल्या वैशाली अंबादास धनगर (27) यांचा विवाह बदलापूर येथील अंबादास वसंत धनगर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती अंबादास याने बदलापूर येथे घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. पैश्यांची पुर्तता न केल्याने पती अंबादास याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेला दामदाटी करून घरातून हाकलून लावले. त्यानंतर शुभांगी अंबादास धनगर या महिलेशी दुसरा संसार थाटल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने अडावद पोलिस ठाण्यात धाव घेवून रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अंबादास वसंत धनगर, सासू त्रिवेनाबाई वसंत धनगर आणि सवत शुभांगी अंबादास धनगर यांच्याविरोधात अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नासीर तडवी करीत आहे.