धुळे। प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 2 लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात पतीसह 13 जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उमरोकोळी रोड दादरानगर हवेल, सेल्वासा येथे सासर व मोहाडी येथे माहेर असलेल्या पूनम किशोर पवार (21)या विवाहितेने माहेरुन प्लॉट घेण्यासाठी 2 लाख रुपये आणले नाहीत या कारणावरून तिचा सासरकडील मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून तिचे स्त्रीधन काढून घेत तिला घरातून हाकलून दिले.
याप्रकरणी पूनम पवार या विवाहितेने मोहाडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पती किशोर शालीकराव पवार, सुनंदाबाई शालीकराव पवार, शालिकराव यशवंतराव पवार, चेतन शालीकराव पवार,रमेश सुखदेव देवरे, दिगंबर रामकृष्ण पवार, महेंद्र रामकृष्ण पवार, दिनेश भीमराव पाटील,राजेंद्र उत्तम पवार,शांताराम पवार,रूपाली निलेश पाटील सर्व रा.सेल्वासा नथ्थू झिपा पाटील,विजुबाई नथ्थू पाटील रा.गोराणो, ता.शिंदखेडा या 13 जणांविरूध्द भादंवि कलम 498 (अ),406, 323, 504, 506 , 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.