दोन वर्षांपूर्वी लांबवली दुचाकी : जळगााव गुन्हे शाखेने आवळल्या आरोपीच्या मुसक्या

भुसावळ : भुसावळ शहरातील नरसवांजी फाईल भागातून दोन वर्षांपूर्वी दुचाकी लांबवल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यास गुरुवारी अटक केली आहे. शेख इरफान शेख बशीर (नसरवांजी फाईल, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, एएसआय शरीफ काझी, नाई युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल रणजीत जाधव आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. दरम्यान, जप्त दुचाकी व आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.