दोन वर्षांसाठीच्या तडीपार गुंडास अटक

0
पिंपरी : दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आढळला. त्यावरून त्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 25) पिंपरी येथे घडली. विशाल बबन गायकवाड (वय 22, रा. गिरजूबाबा मंदिरामागे, बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार गायकवाड याला 20 नोव्हेंबर 2018 रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. मात्र तो तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गायकवाड याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.