दोन वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करताना प्रौढाला चोपले

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील दोन वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणार्‍या 55 वर्षीय प्रौढाला संतप्त जमावाने चोपल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवार, 12 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. सुभाष महादू महाजन (55) असे या संशयीताचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयीताला पब्लिक मार बसल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
संशयीत आरोपी सुभाष महाजन याने मंगळवारी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास चिमुकलीशी गैरवर्तन करीत अश्लील चाळै केले. हा प्रकार नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयीताला पकडून चांगला चोप दिला. पीडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.