दोन शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित

0

पिंपळनेर- निजामपूर । ओबीसी विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोसिएशनतर्फे पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रविण मोरे यांना गरुड जिल्हा वाचनालय धुळे येथे नाशिक विभागस्तर गुरुगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महात्मा ज्योतिराव फुले यांच्यास्मृतीदिन निमित्ताने विशेष उपक्रमशील शिक्षकांची निवड करून देण्यात येतो. प्रविण मोरे यांनी शालेय कविता, व्हिडिओ निर्मिती, विविध उपक्रम तसेच शैक्षणिक संकेतस्थळ निर्मिती करून आपले कार्य सुरू ठेवून शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करत आहेत. नाशिक विभागस्तर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुस्तिका प्रकाशन सोहळाही पार पडला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.ललीता पाटील यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी विलासराव पाटील होते. तसेच पुस्तिका प्रकाशन प्रकाशजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात महेश मुळे, राजेंद्रजी लोंढे, भरत काळे, शैलेश राणे, सुरेश नंदन व इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यांच्या या गौरवबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, कार्यकारी संचालक रुपेश बधान, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी
अभिनंदन केले.

मान्यवरांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण
पुरस्कार वितरणप्रसंगी प्राध्यापक यशवंत ढिवरे सह परिवार, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष रामराव पाटिल, जिल्हाध्यक्ष डी.डी.महाले, जिल्हा चिटणीस विश्‍वनाथ सोमवंशी, नवीनचंद्र भदाणे, महिला संघटक मतीला चन्ने, मती कल्पना सावंत आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रगति फाउंडेशन निजामपुर जैतानेचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव, जेष्ठ शिक्षक बी.डी.कुवर, केवबा बच्छाव, बंडू मोरे, शंकर अहिरे, सुनील जाधव, दिपक मोरे, रविन्द्र पवार, रामचंद्र भलकारे, छोटू सोनवणे, विजय न्याहळदे, योगेश हालोर इत्यादि उपस्थित होते.

पावबा बच्छाव यांचे उल्लेखनिय कार्य
महाराष्ट्र शिक्षक संघटना साक्री तालुक्याचे तालुकाध्यक्ष पावबा धंजी बच्छाव यांना पुरस्कार देण्यात आला. पावबा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षक म्हणून पालकांच्या सहकार्याने 100 टक्के आदिवाशी वस्ती असलेल्या जि.प.शाळा तारपाडा ता. नवापुर जि.नंदूरबार ही शाळा डिजिटल करुन प्रगत केली. नामांकित शाळेत प्रवेशासाठी तालुक्यातील 10 हजार 000 विद्यार्थ्यांमधून फक्त 20 विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यात पावबा बच्छाव यांच्या प्रयत्नातून त्यांच्या शाळेतील 3 विद्यार्थी निवडले गेले. सदर शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, लोकसहभागातून डिजिटल वर्ग, सौरशाळा, आवार कुंपन, पटनोंदनी-उपस्थिति यावर अतिशय उल्लेखनीय कार्य बजावले.