दोन हायप्रोफाईल चोरट्यांना अटक

0

लोणावळा : रायवुड लोणावळा येथिल कटी पतंग या बंगल्यात चोरी करुन साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणारे दोन अट्टल हायप्रोफाईल चोरटे जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. इरफान अख्तर शेख (वय 29 रा.बिहार) व मारूफ मतिउर अली (वय 25 रा.बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. 1 नोव्हेंबर रोजी रायवूड येथील कटी पतंग बंगल्याचे मुख्य दरवाज्याची काच तोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा 6 लाख 50 हजारांचा माल चोरून नेला होता. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेले सिसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीच्या आधारे मर्सिडीज कारमधून टायगर पॉईंट, लोणावळा येथे आलेल्या शेख व अली यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे घरफोडी साठी वापरण्यात येणारे साहित्य स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, कटर मिळून आले. अधिक चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. इरफान शेख वर नवी दिल्लीत घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत.