पुणे । दौंड तालुक्यात झालेल्या दहा गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रासपचे आमदार राहुल कुल यांच्या गटाने वर्चस्व मिळवीत जवळपास आठ सरपंच पदे मिळविली आहेत. तर, पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला केवळ दोनच सरपंच पदे मिळविता आली. कुल गटाने दावा केल्यापैकी पानवली, वाखारी, वाटलूज, पारगाव, पांढरेवाडी, कुरकुंभ, केडगाव, नायगाव या ग्रामपंचायतींची सरपंच पदे मिळविली आहेत. तर, थोरात गटाला वडगावबांडे, खोपोडी येथील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार कुल गटाला जिल्हा परिषदेच्या 6 जागांपैकी 1 सदस्य निवडून आणता आला होता. तर, पंचायत समितीच्या 12 पैकी 1 जागा मिळाली होती. आजच्या या निवडणुकीमुळे कुल गटाला मिळालेल्या यशामुळे कुल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. आज निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी दौंड येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. जसजसा निकाल येत होता त्यानुसार विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करीत होते.
कुरकुंभ : सरपंच- राहुल भोसले (1006), प्रभाग 1 : विनोद शितोळे (248), सुभदा शितोळे (312), अपर्णा साळुंके (268). प्रभाग 2 : जाकिरहुसेन शेख (345), आयुब शेख (297). प्रभाग 3 : उमेश सोनवणे (303), सायरा शेख (293), सुनिता चव्हाण (292). प्रभाग 4 : ज्ञानदेव गिरमे (294), भामाबाई दोडके (240). प्रभाग 5 : सुर्यकांत भागवत (284), पुष्पा पवार (290). पांढरेवाडी ग्रामपंचायत : सरपंच – छाया झगडे (559). प्रभाग 1 : संदीप जगताप (327), सलमा सय्यद (307). प्रभाग 2 : संतोष चव्हाण (139), शोभा जाधव (134). प्रभाग 3 : सुवर्णा झगडे (184), आरती झगडे (188). प्रभाग 4 : नितीन जाधव (176), रोहिणी बनकर (185). पारगाव : सरपंच – जयश्री ताकवणे (2234), प्रभाग 1 : सुनील चव्हाण (470), वैशाली शेंडगे (425), मनिषा जेधे (397). प्रभाग 2 : यमुना साबळे (388), सुनिता चव्हाण (393). प्रभाग 3 : हनुमंत वसव (429), सुभाष बोत्रे (421), राणी ताकवणे (416). प्रभाग 4 : शरद शिशुपाल (414), वंदना शिंदे (386) अलका शेळके (505). प्रभाग 5 : विजय शिवरकर (556), सोमनाथ ताकवणे (393), रमेश बोत्रे (321). प्रभाग 6 : अतुल ताकवणे (483), शहाजी हंडाळ (337), सुनिता चित्रळकर (376). वाखारी : सरपंच – शोभा शेळके (443), प्रभाग 1 : शिवाजी भापकर (229), सरिता इनामदार (248), सुप्रिया शेळके (210). प्रभाग 2 : अतुल आखाडे (165), अनिता गोरगल (262), वंदना दत्तात्रय शेळके (203). प्रभाग 3 : भगवान कुंभार (198), नारायण शेळखे (241), सुजाता इनामदार (189). नायगाव : सरपंच – भारती वाळके (156), प्रभाग 1 : अनिता पाळेकर (35), योगेश जाधव (34), प्रभाग 2 : बेबी खंडागळे (46), प्रभाग 3 : विठ्ठल पांडव (55), मालन काळे (55). खोपोडी : सरपंच – बिनविरोध- सुवर्णा साळवे, प्रभाग 1 : राजेंद्र गरदडे (141), गोदाबाई महारनोर (127), प्रभाग 2 : प्रफुल्ल शितोळे (116), सुमित्रा पवार (103). पानवली : सरपंच – अनिता बोरावणे (196), प्रभाग 1 आणि 3 बिनविरोध. प्रभाग 2 : भरत कांबळे (122), शहाजी कुलाळ (114). वाटलूज : सरपंच – युवराज शेंडगे (434), प्रभाग 1 : नाना कांबळे (267), शारदा कदम (233), गऊबाई गोणे (282), प्रभाग 2 : रावसो शेंडगे (253), स्वाती गोफणे (260), पुष्पा शेंडगे (256). प्रभाग 3 : दत्तात्रय काकडे (164), दत्तात्रय चोरमले (203), मोहिनी भांडवलकर (196). वडगावबांडे : सरपंच – श्रद्धा मेमाणे (453), प्रभाग 1 : जयवंत गरदरे (164), निलेश जाधव (175), वैशाली बांडे (170). प्रभाग 2 : भागुजी पिंगळे (188), कमल बांडे (195). सुभद्रा अप्पा गरदरे (201). प्रभाग 3 : श्रीधर कुंटे (179), वैशाली कुलाळ (182), अश्विनी सोनवणे (162).