द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

0

चालक झाला जखमी

लोणावळा- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून झालेल्या अपघातात
एक चालक जखमी झाला आहे. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणार्‍या इनोव्हा गाडीला धडक दिली. इनोव्हा गाडीने समोरून जाणार्‍या बीएमडब्लू कारला धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने आणखी एका कंटेनरला धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक काही काळ गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती समजताच खंडाळा महामार्गचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली. अपघातामुळे काहीकाळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.