‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीझ

0

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. हा चित्रपट संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावरच आधारित आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तत्कालिन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करीत होते. त्यांचे पंतप्रधान होणे हा केवळ योगायोग होता.  त्यांचा उपयोग राहुल गांधी यांची कारकिर्द उभा करण्यासाठी केला अशा आशयाचा हा ट्रेलर आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.