‘द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलरवरील बंदीची मागणी फेटाळली

0

नवी दिल्ली : ‘द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमातील संवादांवर तीव्र आक्षेप नोंदवत काँग्रेसनं यास विरोध दर्शवला आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर, सिनेमाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

‘द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’ सिनेमामुळे पंतप्रधानांच्या पदाची बदनामी झाली आहे, असा आरोप याचिकाकर्त्या पूजा महाजन यांनी केला आहे. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही.के. राव यांच्या खंडपीठानं संबंधित याचिकेवर निकाल दिला आहे. मात्र, बुधवारी (9 जानेवारी) कोर्टाकडून ही याचिका फेटाळून लावली आहे.