हडपसर । रिपब्लिकन नेते भीमराव दादा कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा ’द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार 2017’ यंदा रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया (ए) च्या पुणे शहराध्यक्ष शशिकला वाघमारे यांना देण्यात आला.
नगरसेविका लताताई राजगुरु यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. रिपब्लिकन विचारवंत प्रा. के. व्ही. सोनकांबळे यांना सुगावा प्रकाशनचे सरसंचालक विलास वाघ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, समाजरत्न शंकर गायकवाड, दादासाहेब सोनवणे, चंद्रकांताताई सोनकांबळे, सुभाष कांबळे, के. एस. सूर्यवंशी, शिवदास सुयवंशी, उमेश चव्हाण, रोहिदास सूर्यवंशी, श्रीनाथ कांबळे, जी. एस. कोतले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष आर. के. लोंढे यांनी केले.