द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल पूर्व प्राथमिक विभागामध्ये दहीहंडी उत्सव साजरा

0
दापोडी :दापोडी येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थी सहभागी होते. या पुस्तकहंडी उत्सानिमित्त पुस्तकांचे विद्यार्थी जीवनातील महत्व सांगण्यात आले. या दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांनी नृत्य, श्‍लोकगायन, यातून आपली कला सादर केली. यावेळी पर्यावरण संर्वधनाच्या पताकांचा उपयोग पुस्तक हंडी सुशोभित करण्यासाठी केला.
यामध्ये प्लॅस्टिक बॅगचा वापर टाळावा व कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. गणेशोत्सावात पर्यावरणपूरक वस्तूचा वापर वाढवा, पाणी वाचवा,जलसंवर्धन, वृक्ष लागवड व वृक्ष संर्वधन  या विषयांच्या पताकांनी परिसर सुशोभित करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजयअण्णा जगताप,चद्रंकांत इंदुरे सर, डॉ.विकास पवार सर, प्रताप बामणे सर, स्वाती पवार व पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाग्यश्री गुंजेकर व नियोजन स्वाती यावले, आभार एलिझाबेथ झोसेफ यांनी केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.