भुसावळ- आज गुरुवारी १२ रोजी कोलते फाउंडेशन संचालित द वर्ल्ड स्कुलमध्ये वृक्षारोपण सप्ताहा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. सी.डी.ई.ई.(टीआरओ) भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लोको निरीक्षक आलोक श्रोत्रीया व लोको पायलेट (श) वाय. डी. ढाके यांनी वृक्षरोपण केले.
विद्यार्थ्यांना श्री.श्रोत्रीया आणि श्री.ढाके यांनी वृक्षारोपण करण्याची गरज व फायदे याचे महत्व सांगितले. प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लावण्याच्या व त्याचे संगोपन करण्याच्या सूचना केल्या. या प्रसंगी रोहित कोलते, रमाकांत चौधरी, चाॅद खा आदींसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.