धक्कादायक! चक्क बियर बारच्यावर कोविड सेंटर

जळगाव- कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, चक्क बियरबारच्यावर डेडीकेटेड कोविड केयर सेंटर थाटण्यात आले आहे.बियर बार आणि कोविड केयर सेंटरची मालकी शहरातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीकडे असल्याचे कळते.या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, या प्रकाराबाबाद माहिती नसून त्याची चौकशी केली जाईल.