नंदुरबार। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दारुड्या मुलाने बापाचा निर्घृण खून केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील नवानागरमुठा गावात घडली. संजय राजाराम तडवी (वय 25) वर्ष या तरुणाला दारूचे व्यसन होते.
गुरुवारी रात्री त्याने वडील राजाराम माणक्या तडवी (वय 53) वर्षे यांच्या कडून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याला वडिलांनी नकार दिला. याचा राग येऊन संजय तडवी या तरुणाने लाकडी दंडक्याने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत रणजीत राजाराम तडवी याने अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलसांनी त्यास अटक केली आहे.