धडक कारवाई करत लाखोंची बनावट दारू जप्त

0

शिरपूर। बनावट दारूने भरलेली गाडी पळासनेरहुन येत असल्याची गोपनीय खबर शिरपूर पोलिसांना मिळाली असता दि 24 रोजी साडे बारा वाजेच्या दरम्यान शिरपूर फाट्यावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातून बनावट दारूची तस्करी होत असल्याचे प्रकरण उघडकीस येत आहेत. यावर अनेकवेळा पोलिसांकडून कारवाई झालेली आहे.

गुन्हा दाखल
दरम्यान 24 रोजी दुपारी शिरपूर फाट्यावर गाडी क्र. एम पी 07 एच ए 8343 या महिंद्रा मॅक्स गाडीतून बनावट दारू जात असल्याचे पोलिसांना समजले असता पोलीस निरीक्षक अशोक वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई करत गाडीसह 3 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून गाडी चालक हकीम सिकंदर खाटीक रा.पळासनेर याला अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.