नंदुरबार : तीन चिमुकल्यांचा नदी ओलांडताना बुडाल्याने मृत्यू झाला. धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे बुधवारी ही घटना घडली. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह एका चिमुकलीचा समावेश आहे. निलेश दीलवर पाडवी (4), मेहेर दिलवर पाडवी (5) व पार्वती अशोक पाडवी (5) अशी मयतांची नावे आहेत.
दुसर्या पाड्यावर जाताना दुर्घटना
धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे तीन चिमुकले दुसर्या पाड्यावरील किराणा दुकानात जाण्यासाठी देवानंद नदी ओलांडत होते मात्र खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत हळहळ व्यक्त करण्यात आली.