धनंजय मुंडेंची दिवाळी यावर्षी दुष्काळग्रस्त भागातील जनतेसोबत

0

मंगळवार पासुन सहा दिवस मतदारसंघातील दुष्काळी भागाचा करणार दौरा

परळी : संपुर्ण राज्यासह परळी विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभुमिवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दिवाळीचा संपुर्ण सण आपल्या मतदारसंघातील जनतेसोबत घालवणार आहेत. मंगळवार पासुन सहा दिवस ते मतदासंघातील दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकरी, नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सोबतच दिवाळी फराळ करणार आहेत.

राज्यासह परळी विधानसभा मतदारसंघातही यावर्षी मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नेहमी प्रमाणे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याऐवजी मतदारसंघातील शेतकर्‍यांशी, नागरिकांशी चर्चा आणि त्यांच्या सोबतच दिवाळी फराळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

उद्या मंगळवार दि.6 नोव्हेंबर पासुन त्यांच्या या दुष्काळी दौर्‍याची सुरूवात होणार असुन सकाळी 11 वाजता ते बर्दापुर जिल्हा परिषद गटातील गावांमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून बर्दापुर येथे नागरिकांशी, शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ते राडी पंचायत समिती गणातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

बुधवार दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ते नागापुर जिल्हा परिषद गटातील गावांमधील दुष्काळी स्थितीची पाहणी करून नागापुरमध्ये जनतेशी संवाद साधणार आहेत. शुक्रवार दि.9 नोव्हेंबर रोजी दादाहरी वडगांव जिल्हा परिषद गटाचा ते दौरा करणार आहेत. शनिवार दि.10 नोव्हेंबर रोजी ते सकाळी 11 वाजता घाटनांदुर, पट्टीवडगांव जिल्हा परिषद गटातील गावांची पाहणी व घाटनांदुर येथे संवाद साधणार आहेत. सायंकाळी धर्मापुरी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये ते भेट देणार आहेत. रविवार दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिरसाळा जिल्हा परिषद गटात तर सायंकाळी गाढे पिंपळगांव गटातील पौळ पिंपरी येथे नागरीकांशी संवाद साधुन त्यांच्या व्यथा जाणुन घेणार असल्याचे त्यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयातुन कळविण्यात आले आहे