धनंजय मुंडेंच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची संमती

0

नवी दिल्ली: बीड जिल्ह्यातील पुस, ता.अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी बेकादेशीररित्या जमीन खरेदी केल्याचे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला आहे. यावरून उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान मुंडे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास संमती दिली आहे. मुंडे यांनी उच्च न्यायालयाच्या याचिकेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. आता यावर उद्या १४ रोजी सुनावणी होणार आहे.

जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना 5400 कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्याकडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश उच्च न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून आपल्याला न्याय मिळेल असे मुंडे यांनी सांगितले आहे.