मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते राज्य मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्री सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत परंतु श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला.
“धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पण अजित पवारांच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. मंत्रिमंडळाची लोक सुरक्षेच्या अंतरावर होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रमही पाच मिनिटांचा होता. कोणतंही भाषण देण्यात आले नाही. ध्वजारोहण करतानाही फक्त पाच लोक उपस्थित होते. कोणालाही करोनाची लक्षणे जाणवलेली नाहीत. आयसीएमआरच्या गाइडलाइनप्रमाणे लक्षणं नसतील तर चाचणी करण्याचा विषय येऊ शकत नाही,” असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.