अनिरुद्ध यादव यांची महावितरणकडे मागणी
खेड शिवापूर । सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हवेली तालुक्यातील कल्याण या गावाचा भाग असलेल्या मेंगजाईदरा धनगर वस्तीवर अजूनही कंदीलावर संसार चालू आहेत. या भागात महावितरण विभागाचे दिवे पोहोचलेले नाही. याबाबत हवेली पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध यादव यांनी महावितरण कार्यालयातील अधिकार्यांशी भेट घेऊन या धनगर वस्तीला प्रकाश द्या’ अशी मागणी यावेळी केली. तर, शेतकर्यांसह इतर ग्राहकांना वीज मीटर लवकरात लवकर पुरवावे, असेही यावेळी खडकवासला मतदार संघाचे सरचिटणीस दीपक रजपूत यांनी अधिकार्यांना सांगितले.
यादव यांनी गेले कित्येक महिने सदर वस्तीवर महावितरणकडून लाईन टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या भेटी घेतल्या. त्या भेटीला यश मिळून जिल्हा नियोजन समितीने सहा पोल आणि मीटरची मान्यता दिली असल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकार्यांची चर्चा करून लवकरात लवकर या मागणीची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही शिवापूर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी सुनील पाटील यांनी दिली. हे काम येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि मेंगजाईदरा धनगर वस्ती प्रकाशमय होईल, असे उपस्थित नागरिकांना सांगितले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, खडकवासला मतदार संघाचे भाजपचे सरचिटणीस दीपक रजपूत, उपाध्यक्ष राजेंद्र दिघे, मोहन शिंदे उपस्थित होते.
Prev Post
Next Post