धनगर समाजातर्फेगुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

0

वरणगाव। येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये धनगर समाज उन्नती मंडळाच्यावतीने कम्युनिटी हॉलमध्ये अहिल्याबाई जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजु सुर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी बोदवड गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, विकास बोरसे, विजय हिवराळे, जनार्दन वाघ, पाचपोळ आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमात अहिल्यादेवीच्या प्रतिमेला माल्यापर्ण करण्यात आले व धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आरक्षणासाठी लढा द्यावा
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी धनके यांनी धनगर समाजाने संघटित होवुन आरक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले, राजु सुर्यवंशी यांनी अहिल्यादेवीच्या वाटचालीवर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी अक्षय सपकाळ, नितेष पाचपोळ, प्रणाली पवार यांनी ही मनोगत व्यक्त केले.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश धनगर यांनी केले तर आभार अविनाश वाजोडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय भाकरे, वाल्मीक खोरकड, शाम देशमुख, गुलाब पवार, जयेश पांढरे, योगेश धनगर, अशोक लवणे, जगदीश भालेराव, आघडते व धनगर समाज महीला मंडळाने परिश्रम घेतले.