मुंबई- धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाल्या. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नसल्याच्या वक्तव्यावरून त्यांनी यू-टर्न घेतल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी ‘आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असतांना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नाही,’ असे बोलले होत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगितले.
धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नसल्याचे आश्वासन देणाऱ्या पंकजा मुंडे आज मंत्रालयात दाखल झाल्या यावेळी राष्ट्रवादीचे आमदार धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखले. यावेळी पंकजा मुंडे यांनी ७० वर्ष ज्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही त्यांना रोखा असे सांगितले.