येळकोट-येळकोट जय मल्हारचा गजर : वाहतूक ठप्प
रावेर- येळकोट-येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत धनगर समाजाला एस.टी.आरक्षण तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून पोलिसांनी आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त राखला आहे.
धनगर समाज बांधवांच्या एकतेची वज्रमुठ
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी रास्तारोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव दाखल झाले आहेत. या आंदोलनात धनगर समाज प्रदेश उपाध्यक्ष व माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, धनगर समाज जिल्हा संघटक हिलाल सोनवणे, धनगर समाज जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष अॅड.प्रवीण पाचपोहे, डॉ.ताराचंद सावळे, जिल्हा उपाध्यक्ष लखन सावळे, माजी सरपंच दिलीप धनके, स्वप्नील लासूरकर, बाजार समिती संचालक प्रमोद धनके, डॉ.भगवान कुवटे, रमेश पाटील, दिलीप सोनवणे, रमेश सावळे, मोहन बोरसे, गणेश बोरसे, राजेंद्र कावडकर, यशवंत धनके, ज्ञानेश्वर हिवराळे, सुरेश हिवराळे, देविदास हडपे, भास्कर कुयटे, तुषार कचरे, अमृत पाचपोहे, पांडुरंग कुवटे, दिलीप सोनवणे, योगेश बोरसे आदी समाजबांधव सहभागी झाले आहेत.