धनादेशाचा अनादर : दिड लाखांच्या दंडासह शिक्षा

0

रावेर- धनादेश अनादर प्रकरणी रावेर न्यायालयाने एकाला सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड सुनावला तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा न्या.आर.एल.राठोड यांनी सुनावली आहे.

तडजोडीनंतर धनादेशाचा झाला अनादर
खटल्याबाबत माहिती अशी की, मुंदखेड, ता.जामनेर येथील सुनील जोशी यांनी एमएसीटी दरखास्तीच्या प्रकरणात साडेआठ लाखांची तडजोड केली होती शिवाय तडजोडीवेळी दोन लाखांची रोकड दिल्यानंतर सात धनादेश प्रत्येकी एक लाखांप्रमाणे तर अन्य एक धनादेश एक लाख 30 हजारांचा दिला होता. या खटल्यातील वादी सुशीला अनिल चौधरी यांनी जोशी यांच्याकडे रकमेची मागणी केल्यानंतर संबंधिताने टाळाटाळ केल्यानंतर चौधरी यांनी बँकेत धनादेश टाकल्यानंतर तो बाऊन्स (अनादर) झाल्याने रावेर न्यायालयात खटला दाखल केला. न्या.आर.एल.राठोड यांनी या खटल्यातआरोपी सुनील गजानन जोशी यास सश्रम कारावास तसेच दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच दंड न भरल्यास वाढीव तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. दंडातील एक लाख 45 हजार रुपये वादी सुशीला चौधरी यांना तर उर्वरीत पाच हजार रुपये सरकारजमा करण्याचा आदेश दिला. आदेशानंतर न्यायालयाने प्रतिवादी सुनील गजानन जोशी यास रावेर पोलिसांच्या अटक करण्याचे आदेश दिले. वादी सुशीला चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश महाजन, अ‍ॅड.सलीम जामलकर, अमोल नाईक यांनी काम पाहिले.