रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार : लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
भुसावळ- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता गैरसोय टळण्यासाठी मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अशा आहेत विशेष रेल्वे गाड्या
18 ऑक्टोबर रोजी नाशिक रोडहून नागपूरसाठी 01017 एलटीटी गाडी सोडण्यात येईल. पहाटे पावणेपाच वाजता ही गाडी सुटून दुपारी 3.15 वाजता नागपूर पोहोचेल. दुसर्या दिवशी 19 रोजी दुपारी 12.15 वाजता नागपूर येथील 01018 अप सुपरफास्ट गाडी सुटून दुसर्या दिवशी दुपारी 3.10 वाजता एलटीटीसाठी पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम, अजनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दुसरी गाडी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते अजनी दरम्यान 18 रोजी सुटेल. 01011 ही विशेष गाडी 18 रोजी रात्री 12.20 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून त्याच दिवशी दुपारी 2.15 वाजता अजनीला पोहोचेल. तसेच 01012 विशेष गाडी 19 ोजी 11.05 वाजता अजनी येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 2.40 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामनगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, शिंदी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. तसेच अनारक्षित ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपुर दरम्यान धावेल. 01075 अनारक्षित स्पेशल ट्रेन 17 ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून दुसर्या दिवशी पहाटे 5.10 वाजता नागपूर पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामनगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी, अजनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे तसेच नागपुर-पुणेसाठी 01030 अनारक्षित स्पेशल रेल्वे 18 रोजी धावणार आहे. 18 रोजी रात्री 11 वाजता नागपूरहून ही गाडी सुटून सायंकाळी 7.10 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामगांव, चंदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, बेलापुर, अहमदनगर, दौंड रेल्वे थांबा देण्यात आला आहे.
आजपासून मिळणार आरखण
01017 व 01018 और 01011 तसेच 01012 या विशेष गाड्यांसाठी आरक्षण लागू असून पीआरएस केंद्रासह रेल्वेच्या संकेत स्थळावरून ते मंगळवार, 16 रोजी पासून करता येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांच्या सुविधेचा तिकीट काढून लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.