धरणगाव। धरणगांव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल हे रजेवर गेल्याने नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्षा सुरेखा महाजन यांना देण्यात आला आहे. सुरेखा महाजन यांना कार्यभार देण्याचा समारंभास पालिका मुख्याधिकारी सपना वसावा, माजी आमदार हरिभाऊ महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, माजा नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी.एम.पाटील, भाजपचे गटनेते कैलास माळी, शिवसेनेचे व भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका आदि उपस्थित होते.
शिवसेनेचे तालुका गजानन पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, राजेंद्र महाजन, भरत महाजन, रवींद्र जाधव, युवा सेनेचे संतोष महाजन,विद्यार्थी सेनेचे विशाल महाजन, संजय चौधरी, शहारसंघटक धिरेंद्र पुरभे, उपशहर संघटक बुट्या पाटील, विलास महाजन, कमलेश बोरसे, सुनील चौधरी, डॉ. विलास माळी, नंदकिशोर पाटील, पप्पू कंखरे, गोलू चौधरी, बापु महाजन, गोपाल महाजन, पप्पू चौधरी, वसीम पिंजारी, लक्ष्मण माळी, चेतन जाधव, राहुल रोकडे यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.