धरणगावात सार्वजनिक वाचनालयास भवरलाल जैन यांचे नाव

0

धरणगाव – शहरातील अरुणभाई गुजराथी सार्वजनिक वाचनालयाचे नामकरण करत भवरलाल जैन वाचनालय असे करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. डी.आर. पाटील, सचिन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक वाचनालयाचे अध्यक्ष पी.एम. पाटील यांनी केले.

यावेळी गुलाबराव वाघ म्हणाले, वाचनालयाला भवरलालभाऊ यांचे नाव देण्यासाठी पी.एम. पाटील यांनी अशोक जैन यांच्याकडे प्रस्ताव मांडला. त्यांनी मजूर केला. धरणगाव पालिका सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून वाचनालयाला मदत मिळून देऊ. अध्यक्षीय भाषणात सभापती सचिन पवार पवार यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भवरलालभाऊ जयंतीनिमित्त मुकबधीर विघालयात अन्नदान, चादर वाटप, भवरलालभाऊ जैन यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन, मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमांचा समावेश होता.

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सलीम पटेल, गटनेते पप्पू भावे, परीट समाजाचे प्रांत सदस्य छोटू जाधव, नगरसेवक वासुदेव चौधरी, राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी, नगरसेविका आराधना पाटील, नगरसेवक भागवत चौधरी, योगेश वाघ, शालेय समिती अध्यक्ष योगेश पाटील, अजय चव्हाण, मोहन महाजन, जितेंद्र धनगर, नंदकिशोर पाटील, मुकबधीर विघालयाचे वाल्मिक पाटील, दीपक जाधव, वाचनालयाचे सचिव अनंत जाधव, आर.एच. पाटील, किशोर पाटील, चंद्रराव सैंदाणे, ऋषिकेश जाधव, संतोष भडांगे उपस्थित होते.