धरणगाव । येथिल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालय अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य गीत व नाटिका सादरीकरण करून जनजागृती दिशा समाज प्रबोधन बाहुद्देशीय संस्था जळगाव विनिद ढगे आणि त्यांचे सहकारी यांनी या विषयावर आपल्या खास शैलीत या विषयावर पथनाट्य व लोक गीत सादर करून जनजागृती करण्यात आले. तसेच जादूगार श्री राजू यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायरक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बी.एल.खोंडे यांनी केले तर आभार एनएसएस प्रमुख प्रा.एम.एस.कांडेलकर यांनी मानले.