धरणगाव येथे माळी समाजातर्फे गुणगौरव सोहळा

0

धरणगाव। येथील माळी समाजातर्फे गुणगौरव सोहळा सोमवारी 16 जुलै, 2017 रविवार रोजी येथील माळी समाज मढीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा महाजन होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार हरीभाऊ महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, प्रा.बी.आर.माळी, कैलास माळी, नगरसेवक विलास माळी, संजय महाजन, विठोबा महाजन, आसाराम महाजन, शांताराम महाजन, दशरथ महाजन, डिगंबर महाजन, एस.डब्ल्यु.पाटील, मधुकर रोकडे, राजेंद्र महाजन, गोपाल महाजन, कांतिलाल महाजन, व्ही.पी.महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सर्वप्रथम नगराध्यक्षा सुरेखाताई महाजन व मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, महात्मा फुले, सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व समाजाची सेवा करण्याची प्रेरणा दिली. भाग्यश्री देशमुख, जोत्स्ना माळी, मनोज महाजन, भूषण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.टी. माळी व पी. डी. पाटील यांनी केले तर आभार हेमंत माळी सर यांनी मानले. कार्यक्रमयशस्वीतेसाठी समाजाचे दशरथ महाजन, आर.डी. महाजन, व्ही.टी.माळी, के.आर.वाघ, हेमंत माळी, पी.डी.पाटील, हरिभाऊ माळी, अनिल महाजन, आबा माळी यांनी परीश्रम घेतले.