धरणगाव येथे शिवसेनेकडून विद्युत विभागाला निवेदन

0

धरणगाव । येथील तालुक्यात 8 ते 10 दिवसांपासून लोडशेडीगची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून शेतात रात्रीच्या वेळी भरणा करण्यास मोठी कसरत करावी लागते. वारंवार या वेळापत्रक बदलामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील थंडीचे प्रमाण जास्तीचे असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात भरणा करण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे रब्बी पिकाचे मोठे नुकसान होईल.

प्रसंगी विषारी सर्पदंश झाल्यास जीवीतहानी होऊ शकते म्हणून रात्री 12 ते 10 पर्यंत लाईट चालू ठेवावी त्यामुळे 5 ते 6 तास भरणा होऊ शकतो. यामुळे शेतकरी व विद्युत मंडळ दोघांचे नुकसान होणार नाही. शेतकर्‍यांची अडचण समजून लोडशेडींगची वेळ पूर्वीप्रमाणे ठेवावी असे निवेदन आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, नगराध्यक्ष सलीम पटेल, गटनेते विनय भावे, नगरसेवक सुरेश महाजन, भागवत चौधरी, वासुदेव चौधरी, अजय चौहाण तसेच शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, धिरेंद्र पुरभे, कमलेश बोरसे, भरत महाजन, विलास महाजन, मोहन महाजन, रविंद्र कंखरे, किशोर चौधरी, नंदकिशोर पाटील यांनी दिले.