आधी पुर्नवसन करा मगच पाण्याचे आर्वतन सोडणार
भामा-आसखेड प्रल्कल्पग्रस्तांनी दिला इशारा
वासुली : भामा आसखेड प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी पाटबंधारे विभागास भामा नदीला पाणी सोडण्यासाठी तगादा लावला असून त्या पार्श्वभूमीवर येथील प्रकल्पग्रस्तांनी भामा आसखेड व चासकमान पाटबंधारे व सिंचन विभागास लेखी निवेदन देऊन आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. भामा आसखेड लाभक्षेत्रातील काळूस, शेल-पिंपळगाव, कोयाळी, सिध्देगव्हाण, बहुळ येथील शेतकर्यांची कांदा व अन्य पिके पाण्याअभावी जळून चालली आहे. यंदा पडलेला कमी पाऊस त्यामुळे विहिरींना तळ गाठलेला आहे. धरणात मुबलक पाणी असुनही भामा नदीचे पात्र कोरडं ठणठणीत पडलेले आहे. शेतातील पिकांना पाणी देण्याचा अन्य कुठलाही पर्याय नसल्याने शेतकर्यांनी भामा आसखेड सिंचन विभागाकडे धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी तगादा लावला असल्याचे भामा आसखेड जन आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते सत्यवान नवले, देविदास बादल आदींनी सांगितले. आधी पुनर्वसन मगच धरणातून पाण्याचे आवर्तन असा ठाम निर्धार येथील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. तसेच भामा आसखेड कार्यकारी अभियंता शर्मा यांना आवर्तन सोडल्यास प्रकल्पग्रस्तांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आली आला.
कार्यवाही झाली नाही
परंतु प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आवर्तन सोडु नये म्हणून 20 तारखेला चासकमान पाटबंधारे विभाग पुणे व भामा आसखेड सिंचन विभाग करंज विहीरे यांना प्रत्यक्ष लेखी निवेदनाद्वारे विनंती व विरोध असल्याचे सांगितले आहे. दरम्यान 5 सप्टेंबर 2018 रोजी पुणे येथे भामा आसखेड प्रकल्पग्रस्त व महसुल प्रशासन यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांचे अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत आमदार सुरेश गोरे यांच्या मध्यस्थीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करून एकूण 388 शेतकर्यांना पर्यायी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसर्या दिवसापासून तशी प्रक्रिया चालु करणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी जाहिर केले होते. परंतु आजतागायत अशी कोणत्याही प्रकारची कार्यवाही चालु झाले नसल्याने संबंधित शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रशासन आश्वासनांचं गाजर दाखवून प्रकल्पग्रस्तांची थट्टा करत असल्याचा आरोप केला जात आहे.
अन्यायकारक वागणूकीचे आरोप
धरणातून आवर्तन सोडण्यासाठी दबाव येत असतानाच सर्व प्रकल्पग्रस्तांनी निवेदन देऊन विरोध दर्शविला आहे. निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्तांनी पाणी मागणार्या शेतकर्यांना व महसुल प्रशासनावर अन्यायकारक वागणूक देत असल्याचे आरोप केले आहेत. एकीकडे प्रशासन म्हणतंय की धरणाचा डावा व उजवा कालवा काम रखडलेल्याने लाभक्षेत्रच उरले नाही. तर दुसरीकडे काही प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना काळूस आदी गावांमध्ये मिळालेल्या जमीन कसण्यास व ताबे वहिवाटीस हल्ला हरकत शिविगाळ केली जाते. अशा परिस्थितीत धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी कसे करतात. असे प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी उपस्थित केेले आहेत. दोन दिवसापांसून सगळे प्रकल्पग्रस्त शेतकरी भामा आसखेड प्रकल्प करंजविहीरे येथे आवर्तन सोडण्यास विरोध करण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत.