पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्यार्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून गेल्या 24 तासात 124 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात 6.78 टक्यांनी वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 124 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 6.78 टक्यांनी वाढ झाली आहे. तर, 1 जूनपासून 1556 मिमी पाऊस झाला असून 39.80 टक्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 63.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत पवना धरण परिसरात 1519 मिमी पाऊस झाला होता. तर, धरणात 58.83 टक्के पाणीसाठा होता.
एका ट्रेकर मुलीचा मुत्यु
पवनमावळ परिसरातील तुंग किल्ल्यावर आलेल्या ट्रेकर मुलीचा मृत्यू झाला. गडावरुन खाली उतरताना पाय घसरुन सुमारे पन्नास फुटाच्या अंतरावरुन खाली पडून ईशिता मुकुंद माठे ( वय. 15 रा. हडपसर) या ट्रेकर मुलीचा मृत्यु झाला. इशिता मित्रमैत्रणींसोबत ट्रेकिंगसाठी तुंग किल्ल्यावर आली होती. सकाळी अकराच्या सुमारास गडावर गेल्यानंतर सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास खाली उतरताना पाय घसरुन तोल गेल्याने ती खाली दरीत पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डोक्यात मार लागल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. लोणावळा ग्रामीणचे पोलीस हवालदार राकेश पांलाडे व सुनिल गवारी यांनी शिवदुर्ग मित्रच्या सहाय्याने घटनास्थळी शोध मोहिम राबवत ईशिताचा मृतदेह बाहेर काढला.