धरण कोरडेच; संघर्ष समितीचे भजन आंदोलन

0

शिंदखेडा – तालुक्यातील अमरावती धरण गेल्या अनेक वर्षांपासून कोरडे असुन पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेतीला पाणीच नसल्याने परिसर हवालदिल झाला आहे. लोकप्रतिनिधी जाणुन बूजुन दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून संघर्ष समिती वतीने भजन आंदोलन करण्यात आले. हयावेळी आंदोलन प्रमुख पं.स.सदस्य सतिष पाटील, मनोहर देवरे, डॉ.रविंद देशमुख, गुलाब सिंग सोनवणे, विठ्ठल सिंग गिरासे, बापु महाजन, हिलाल अहिरे यांच्यासह मालपुर गावासह परिसरातील हजारो च्या संख्येने शेतकरी व शेतमजूर हजर होते. बुराई व तापी नदीतून हत्या अमरावती मध्यम प्रकल्पात पाणी टाकण्यात यावे तरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल. वेळोवेळी जन आंदोलन करुन देखील शासन दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करीत आहेत. ह्यावेळी कार्यकारी अभियंता डी.डी.यांना निवेदन देण्यात आले. ह्याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात अमरावती धरणापासून ते थेट आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.