धरण दुरुस्तीसाठी खासगी कंपनी नको

0

टेमघर धरणाची भौगोलिक रचना आणि गळती लक्षात घेता मदत घेण्यास नकार

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू असून या धरणाची दुरुस्ती पुढील वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, टेमघरच्या दुरुस्तीसाठी खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून सीडब्लू अ‍ॅन्ड पीआरएसकडे सादरीकरणही करण्यात आले होते. परंतु, टेमघरची भौगोलिक रचना आणि गळती लक्षात घेता खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेण्यास नकार देण्यात आला आहे.

नोव्हेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबविण्याचे आणि धरणाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे.

3.43 टक्के एवढा पाणीसाठा

सद्य:स्थितीत टेमघर धरणात 0.13 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 3.43 टक्के एवढा पाणीसाठा असून हे पाणी सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबविण्याचे आणि धरणाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली आहे. परंतु, धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.

केंद्रीय समितीकडून आढावा

जिओ मेंबरिंग नावाचे हे तंत्रज्ञान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्पी ग्लोबल कॅपिटल कंपनीचे हे तंत्रज्ञान असून या तंत्रात पीयूसी पेपरसारखा प्लास्टिक पेपर बनविण्यात येतो. धरणाच्या ज्या बाजूने गळती आहे, त्याच्या ऊध्र्व बाजूने हा पेपर लावण्यात येतो. त्यानंतर त्यावर स्टील प्लेट लावून नटबोल्टद्वारे त्या कायमस्वरूपी जोडल्या जातात. ही आधुनिक पद्धत असून कंपनीकडून कामाची दहा वर्षांची हमी, तर 15 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तामिळनाडूमधील कदम पराई या धरणाची गळती या तंत्रज्ञानाने रोखण्यात आले. दरम्यान, टेमघरच्या दुरुस्तीचा आढावा केंद्रीय समितीकडून घेण्यात येणार असून धरणाची प्रत्यक्ष पाहणीदेखील करण्यात येणार आहे.

जिओ मेंबरिंग तंत्रज्ञान

धरणे आणि त्यामधील गळती याबाबत दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात एक बैठक पार पडली होती. बैठकीत तामिळनाडू येथील कदम पराई या धरणाची गळती रोखण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले, त्याबाबत चर्चा करण्यात आली. हेच तंत्रज्ञान टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी वापरल्यास त्याचा फायदा होईल, असे मत जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त करत नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेऊन त्याबाबतचे सादरीकरण सीडब्लू अ‍ॅन्ड पीआरएसकडे केले. जिओ मेंबरिंग नावाचे हे तंत्रज्ञान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्पी ग्लोबल कॅपिटल कंपनीचे हे तंत्रज्ञान असून या तंत्रात पीयूसी पेपरसारखा प्लास्टिक पेपर बनविण्यात येतो. परंतु, टेमघर धरणाची भौगोलिक रचना आणि गळती लक्षात घेता खासगी कंपनीची मदत घेण्यास नकार देण्यात आला आहे. दरम्यान, टेमघर धरण रिकामे करून धरणाच्या भेगांमध्ये सिमेंट भरण्याचे काम केले जाणार आहे. तसेच शॉर्ट क्रीट (सिमेंटचे प्लास्टर) करण्यात येणार आहे.