नंदुरबार। समाजसहाय्य, धर्मसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापना यासाठी रविवार दि.30 एप्रिल 2017 रोजी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी गुरुवार दि.27 एप्रिल या दिवशी सायंकाळी 5 वाजता हिंदु धर्माभिमान्यांच्या सहभागाने विराट पदफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या धर्मसभेला प्रखर धर्माभिमानी म्हणून प्रसिध्द असलेले भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार राजासिंग ठाकूर उर्फ टी.राजासिंग हे प्रमुख वक्ते म्हणून नंदुरबारच्या या सभेला लाभले असून सनातन संस्थेचे संत पुजनीय नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृृती समितीचे प्रदेश संघटक सुनिल घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे हेही या धर्मजागृती सभेतून मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांची उपस्थिती लाभणार आहे.
धर्मध्वज पूजन
या सभेच्या प्रचार-प्रसारासाठी उद्या दि.27 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मप्रेमींची पदफेरीचेही आयोजन केले असून छत्रपती नाट्य मंदिरापासून या पदफेरीला सुरुवात होईल. यात धर्मध्वज पुजनाने प्रारंभ होणार असून मान्यवरांच्या हस्त नारळ वाढवले जाईल. त्यानंतर शहरातील प्रमुखमार्गांवरुन पदफेरी काढण्यात येणार आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शहरातील प्रमुख चौकांत या पदफेरीचे स्वागत केले जाणार आहे.