धर्मदाय आयुक्तांचा हिरवाकंदील

0

चिंचवड – चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ गंगाराम चिंचवडे यांच्या विरोधात सुरेश चिंचवडे, सुर्यकांत चिंचवडे, मुरलीधर चिंचवडे, नानासाहेब चिंचवडे यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र धर्मदाय आयुक्तांनी सर्व आरोप फेटाळून क्लिनचिट दिली. सुरेश चिंचवडे यांच्या म्हणण्यानुसार कार्यकारी मंडळाने कोणतीही पूर्वसूचना न देता बैठक घेतली. कोणीही हजर नसलेल्या या बैठकीत हजेरीपत्रक सूचनेची पोच, एनओसी या सर्व कागदपत्रांवर खोट्या सह्या घेऊन चेंज रीपोर्ट तयार केला. मात्र हे सर्व रिपोर्ट खरे असून आयुक्तांनी ते मंजूर करून घेतले. अ‍ॅड. मनोज वाडेकर व अ‍ॅड. संजय भळगर यांनी काम पाहिले.